शरद पवार गटाच्या पक्षाचे नाव-चिन्ह काय असणार?

बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (11:50 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल दिला आहे. त्यानुसार पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे.

"निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्वीकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखीन वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही काल ही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू हा विश्वास जनतेला देतो," अशी प्रतिक्रिया या निकालानंतर अजित पवार यांनी दिली आहे.6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला आहे.या निकालाची प्रतिक्रिया येऊ लागली आहे.

निकालानंतर शरद पवार यांचा समोर पक्षाचे नवीन नाव व पक्षाचे चिन्ह काय असेल हे ठरवणं  मोठं चॅलेंज आहे. तसेच कमी कालावधीत लोकांसमोर चिन्ह पोहोचण्याचे आव्हाहन असणार आहे. शरद पवार यांनी शरद पवार काँग्रेस, शरद स्वाभिमानी पक्ष, मी राष्ट्रवादी या नांवावर  विचार केला जात आहे. तर कपबशी, चष्मा, उगवता सूर्य, सूर्यफूल या चिन्हांचा विचार केला जात आहे. त्यांना नव्या पक्षाची व नवीन चिन्हाची नावे आज निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. त्यांना आज बुधवारी 4 वाजे पर्यंतची मुदत दिली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जाणारी होणार आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती