2 जुलै 2023 रोजी महायुतीत सहभागी होत शरद पवारांच्या विरोधात बंड पुकारले. पक्षातील बहुसंख्य आमदारांना त्यांनी आपल्या बाजूने उभे केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. निवडणूक आयोगातही या संबंधीची याचिका दाखल केली, त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना बहाल केले. या निर्णयाचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की लोक कामाला महत्त्व देतात. चौफेर विकास राज्यात होत आहे. केंद्र सरकारचं पाठबळ आमच्यासोबत आहे. डबल इंजिनचं सरकार बुलटे ट्रेन वेगाने धावत आहे. आमचं सरकार सामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 45 हून अधिक खासदार आमचे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर विधानसभा निवडणुकीतही महायुती बहुमताने विजयी होईल, असे ते म्हणाले.