नाशिकवर पाणीकपातीचे संकट? 41 टक्केच पाणीसाठा

मंगळवार, 25 एप्रिल 2023 (08:53 IST)
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून प्रशासन आता येणाऱ्या काही दिवसात पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील सात मोठी आणि 17 मध्यम अशा 24 धरणांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज देण्यात आली. यामध्ये नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 53 आणि दारणा धरणांमध्ये 66 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

कश्यपी मध्ये 52, गौतमी 16, आळंदी 31, पालखेड 36, करंजवण 29, वाघाड 14, ओझरखेड 31, पुणे गाव 22, तिसगाव 17, भावली 39, मुकणे 56, वालदेवी 48, कडवा 28, नांदूरमध्यमेश्वर 89, भुजापूर 22, जनकापुर 53, हरणबारी भावना केळझर 40, नागासाकी 10, गिरणा 29, पुण्यात 78, माणिकपुंज 0 असा 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीने पाणी कपातीच्या धोरण स्वीकारले जाऊ शकते अशी शक्यता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती