निर्बंधमुक्त वारीमुळे वारकऱयांचा उत्साह दुणावला

बुधवार, 8 जून 2022 (21:59 IST)
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी आषढी वारीला काही दिवसातच सुरूवात होणार असुन, अनेक भाविकां समवेत प्रशासन ही या वारीच्या तयारीत गुंतलेले आहे. कोरोना काळात मागील दोन वर्षे आषाढी निमित्त काढण्यात येणाऱया पायी दिंडी सोहळय़ावर निर्बंध घालण्यात आले होते. पण यंदा मात्र पुन्हा जोमात या दिंडीला सुरूवात होणार आहे. यंदा 15 लाखाहुन अधिक भाविकांची उपस्थिती असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
साताऱयातुन ही अनेक भाविक या पायी दिंडीत सहभागी होतात. पुरूषां बरोबरच महिला वर्गांचाही यामध्ये तितकाच सहभाग असतो. प्रत्येक दींडीमध्येजवळ 500 हुन अधिक भाविकांचा समावेश असतो. यामध्ये दि. 21 रोजी आळंदी हुन ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे. तसेच दि. 20 रोजी तुकाराम महाराजांची देहु येथुन पालखी पंढरपुरासाठी प्रस्थान करणार आहे. दिंडीमध्ये सामील होण्याकरिता साताराहून भाविक दि. 19 व 20 रोजी रवाना होणार आहेत. विविध मार्गावरून निघणाऱया पालख्या 20 व्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशी दरम्यान पंढरपुर येथे पोहचणार आहे

साताऱयातुन ही अनेक दिंडय़ा या आषाढी वारीमध्ये सहभाग घेण्याकरीता निघतात. यामध्ये दि. 21 रोजी आळंदी हुन पंढरपुरला माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. साताऱयातुन 99 नंबरची दींडी ही सज्जन गडहुन माऊलीच्या रथाच्यापाठीमागे असते. तसेच कुडाळ हुन 21 नंबरची दींडी निघते. तसेच काही पालख्या या तुकाराम महाराज्यांच्या सोहळय़ातुन देहु येथुन निघतात. यामध्ये निनाम पारळी, 73 नंबरची आंबेदरी दिंडी, 95 नंबरची डबेवाडी येथुन निघते. अनेक सातारकर भाविकांचा या दिंडीमध्ये सहभाग असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती