'पंढरपूरसह देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बुद्ध विहारे, स्तूप'

बुधवार, 25 मे 2022 (09:32 IST)
पंढरपूरचे विठोबा मंदिर, ओरिसातले जगन्नाथ मंदिर, तिरुपती येथील बालाजी मंदिर अशी देशातली अनेक मंदिरं पुर्वी चैत्यगृहं, विहार आणि स्तूप होते, असं मत डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केलं आहे. 
 
संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केले आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' (1929) या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, "ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या." असं आगलावे सांगतात.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत डॉ. आगलावे यांनी पंढरपूरचे मंदिर हे बौद्ध धर्माचे देवालय असल्याचे म्हटले आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 एका भाषणात सांगितले होते की, पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन." असा संदर्भ त्यांनी दिला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती