Ashadhi Wari 2022 :रुक्मिणी मातेची पालखी आज पंढरपूरला रवाना झाली आहे. कोरोना नंतर प्रथमच आज सायंकाळी रुक्मिणी मातेची पालखी आज पायदळी निघाली आहे. टाळ, मृदूंग ,वीणाच्या गजरात भगवा झेंडा पताका घेऊन 10 पालख्यातील विदर्भातील कोंडण्यापूरातील रुक्मिणी मातेची माहेरची पालखी घेऊन वारकरी बांधव मोठ्या संख्येने श्री नामाच्या जयघोषात निघाले आहे. या पालखीचे स्वागत जागोजागी होणार आहे.आषाढी एकादशीला दरवर्षी वारकरी बांधव रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन तिच्या माहेरून रुक्मिणी मातेच्या सासरी पंढरपुरात नेण्याची 400 वर्षाची जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमरावतीमधून कौंडण्यपुरातून रुक्मिणी मातेची एकमेव पालखी निघते. कोरोनाच्या प्रादुर्भावांनंतर तब्बल दोन वर्षाच्या नंतर पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली असून आज रुक्मिणी मातेची पालखी सासरी जाण्यासाठी पंढरपूरला निघाली आहे. या पालखीचे स्वागत जागोजागी होणार आहे.