रविवारी रात्री मुंबईतील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या पाच मजली इमारतीचा स्लॅब आणि पॅरापेटचा काही भाग कोसळून एक माणूस आणि 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. विक्रोळी परिसरातील कैलास बिझनेस पार्क येथे रविवारी रात्री 11.10 वाजता ही घटना घडल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.