देशभरात प्रचंड उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे 227 जणांचा मृत्यू

शुक्रवार, 31 मे 2024 (18:35 IST)
देशभरात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. तापमान वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे आता पर्यंत देशभरात 227 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 
 गुरुवारी देशभरात 227 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक 164 मृत्यू उत्तर प्रदेशात झाले आहेत.

 बिहारमध्येही 60 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत 1 मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मजुराला 107 अंश ताप होता. दुसरीकडे, हरियाणामध्येही दोन मृत्यू झाले आहेत.राजस्थान मध्ये 5 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर ओडिशात 10, झारखंड 7, आंध्रप्रदेशात 7, महाराष्ट्रात 12 जणांचा मृत्यू झाला 

केरळ मध्ये मान्सून दाखल झाला असून येत्या काही दिवसांत सर्वत्र पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. 

Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती