रेमल चक्रीवादळाने घेतला 33 जणांचा बळी

बुधवार, 29 मे 2024 (12:59 IST)
रेमल चक्रीवादळामुळे मेल्थम मध्ये दगडांची खदान वाहून गेली, या दुर्घटनेमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये चार या वादळामुळे चार लोकांचा जीव गेला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहे. 
 
रेमल वादळ ईशान्य भारतात तांडव करत आहे. ज्यामुळे हाहाकार झाला आहे. या वादळामुळे ईशान्य भारतात कमीकमी 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. मिजोरम मध्ये 28 लोकांचा जीव गेला आहे. तर 10 जण बेपत्ता आहे. मेल्थम मध्ये दगडांची खदान धसल्याने 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आसाममध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक बेपत्ता आहे. 
 
रेमल वादळात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना मिजोरम सरकारने 4 लाख रुपए मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे. सोबतच शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या वादळामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इंफाळ मध्ये पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. रेमल चक्रीवादळामुळे आसाम, त्रिपुरा मध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून इंटरनेट बंद पडले आहे.
 
रेमल चक्रीवादळामुळे काय काय झाले?
आसामधील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.आसामधील सर्व शाळा बंद राहतील. खराब हवामान आणि भूस्खलन मुळे ईशान्य भारतात  कनेक्टिविटी तुटली आहे. लोकांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला समस्या येते आहे. पाऊस आणि पुरामुळे नागालँडचा दोयांग बांध जलाशय मध्ये बुडला आहे. मेघालायच्या खासी पर्वत परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. मेघालयच्या सगारो हिल्स क्षेत्र मध्ये चक्रीवादळामुळे 200 पेक्षा जास्त घरे उध्वस्त झाली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती