रेमल चक्रीवादळाचा हाहाकार!

बुधवार, 29 मे 2024 (11:55 IST)
रेमल चक्रीवादळ हे बांगलादेश  आणि लगतच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन धडकले. ताशी 135 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. तसेच अवकाळी मुसळधार  पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये खूप नुकसान होऊन हाहाकार झाला आहे. 
 
पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता मध्ये एंटली परिसरात भिंतीचा भाग कोसळल्याने एका 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे तर एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे या दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 
 
पश्चिम बंगालमध्ये आलेल्या या चक्रीवादळामुळे अनेक घर उध्वस्त झाली आहे तर अनेक लोक बेघर झाले आहे. तसेच चक्रीवादळात हवा जलद गतीने वाहत असल्याने विजेचे खांब देखील उमळून पडले आहे. तर सुंदरबन परिसरात ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्यामुळे जण जखमी झाले आहे. 
 
तसेच हवामान विभागाने हे वादळ आणखीन कमकुवत होईल अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच हे चक्रीवादळ गेल्या काही तासांमध्ये उत्तरेकडे सरकले असून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकले आहे. या रेमन चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती