वाहनांचे नुकसान होवू नये म्हणून महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधी कळवण्यात येतं. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि फांद्या छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले तर महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.
यंदा मुंबई महानगरात एकूण 1 लाख 12 हजार 728 झाडांची छाटणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 12 एप्रिल 2024 अखेरपर्यंत 15 हजार 821 झाडांची छाटणी झाली आहे. 7 जून 2024 अखेरपर्यंत उर्वरित 96 हजार 907 झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागानं ठेवलं आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली 414 झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी 338 झाडे काढून टाकण्यात आली असल्याचं उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी सांगितलं. खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहनही जितेंद्र परदेशी यांनी केलं आहे.