न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ते तिथं जात नाहीत अशांनी आम्हाला षंड बोलू नये

बुधवार, 7 डिसेंबर 2022 (15:10 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणानं मी धिक्कार करतो, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सरकारला षंड असं संबोधल्याच्या मुद्द्यावर शंभुराज देसाई चांगलेच संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी जर अशी विधानं थांबवली नाहीत तर आमची दोन करण्याचीही तयारी आहे, असा उघड इशारा दिला आहे.
 
"सीमावादावर केंद्रानं लक्ष द्यावं. दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी करत आहेत. असं असताना षंड हा शब्द संजय राऊत यांनी आमच्या सरकारवर आणि आमच्यासाठी वापरला. संजय राऊत स्वत: कोण आहेत हे त्यांनी एकदा तपासून पाहावं. कारण ज्यांना १५ दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचं समन्स कर्नाटकच्या कोर्टानं धाडलं ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस राऊतांकडे नाही. न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ते तिथं जात नाहीत अशांनी आम्हाला षंड बोलू नये", असं शंभूराज देसाई म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती