महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्या नंतर महाराष्ट्रात पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला दिल असून ते राज्यातील पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट ठरले आहे. यामध्ये अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र दिले आहे. वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतोय.त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी या जात प्रमाणपत्राचा फायदा होणार आहे. दरम्यान गावा-गावात जाऊन कागदपत्र गोळा करून मराठा समाजाला जात प्रमाणपत्राचं वाटप करणार असल्याची माहिती अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.