राज्यात मोठी पोलिस भरती होणार

Webdunia
शनिवार, 29 जानेवारी 2022 (09:57 IST)
राज्यात लवकरच 7,200 पदांसाठी पोलिस भरती केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 5,200 पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.
 
या पदांसाठीच्या लेखी आणि शारीरिक परीक्षा झाल्या असून त्याची अंतिम यादी जाहीर करणं बाकी आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7,200 जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार.

संबंधित माहिती

पुढील लेख