उर्दु ही मुस्लीम समाजाची भाषा असल्याचा चुकीचा समज पसरला आहे - कसबे

सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:02 IST)
गौतम बुद्ध के अक्वाल -ए- जरीन पाकिस्तानमध्ये प्रकाशित होणार  लेखकाची माहिती .आपल्या देशात भाषेवरून नेहमीच राजकारण होत आल आहे. यातूनच उर्दु ही मुसलमान लोकांची भाषा असल्याचा समज पसरला. हा समज खूप चुकीचा असून ही भाषा अतिशय सुंदर आहे. यात कमी शब्दात मोठा आशय सांगितला आहे असे प्रा.डॉ.रावसाहेब कसबे यांनी  सांगितले. ते उर्दू भाषेचे अभ्यासक डॉ. रवींद्र शिवदे यांनी लिहीलेल्या 'गौतम बुद्ध के अक्वाल -ए- जरीन’ या  पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
 
यावेळी  उत्तमराव कांबळे (साहित्यिक), प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (विचारवंत आणि साहित्यिक), प्रा.डॉ.दिलीप धोंडगे (साहित्यिक), अश्फाक अहमद खलिफा (उर्दू अभ्यासक) आणि जनाब इलियास लाल बेग मिर्झा (उर्दू अभ्यासक), डॉ. धनंजय चव्हाण, डॉ. मनीषा जगताप, डॉ. अनुजा शिवदे , डॉ.पूनम शिवदे, डॉ.निवेदिता पवार, रजनी खानदेशी उपस्थित होते.
 
पुस्तकावर बोलताना कसबे म्हणाले की , आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हे पुस्तक उर्दु  भाषेला अधिक समृद्ध करेल आणि वाचकांचं जगणं सुंदर असे सांगितले. मनोगत व्यक्त करतांना या पुस्तकाच्या माध्मातून उर्दू वाचकांना धम्मपदे वाचण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.बुद्धांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. प्रकाशकांकडून लवकरच पाकिस्तानमध्ये या पुस्तकाची छपाई होणार असल्याची माहिती डॉ. शिवदे यांनी दिली. प्रास्ताविक करताना जगात सर्वच भाषांमध्ये भाषांतरांची मोठी कामे झाली आहेत. मात्र भारतामध्ये याबाबत खूप उदासीनता दिसते अशी खंत व्यक्त केली. या पुस्तकामुळे एका प्रकारे भाषेची सेवा केले असल्याचे मिर्झा यांनी सांगितले. यावेळी बहोत ही शरबती हो तुम ही शायरी सादर केली.  जगातल्या सर्वच महान पुरुषांनी मानवी कल्याणासाठी प्रयत्न केले. यासाठी पुस्तकच हे नेहमीच माध्यम म्हणून निवड  आहे. हे पुस्तकही अशाचप्रकारे असल्याचे दोंडगे यांनी सांगितले. जगात वाढत असलेले अशांततेचे वातावरण पाहाता अशा प्रकारच्या पुस्तकाची अत्यंत गरज असल्याचं खलीफा यांनी सांगितले. कार्यक्रमात बोलताना कांबळे यांनी सांगितले की, बुद्ध हे पहिले विचारवंत, ज्यांनी मनाचा विचार केला. दुःख कुठे सुरू होत याचा शोध बुध्दानी घेतला. तर  उर्दु भाषा खूप सुंदर आहे. ती  कुठल्याही कंगाल माणसाला श्रीमंत करते समृद्ध करते असे त्यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती