Omicron in Maharashtra : सातारा,पुणे आणि मुंबईत 8 नव्या 'ओमायक्रॉन रुग्णांची नोंद

रविवार, 19 डिसेंबर 2021 (17:41 IST)
सध्या दक्षिण आफ्रिकेतून आलेला'ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे महाराष्ट्र हॉटस्पॉट ठरत आहे. शनिवारी राज्यात आठ नवीन 'ओमायक्रॉन रुग्णांची नोंद केली गेली. त्यापैकी 3 रुग्ण सातारा, 4 रुग्ण मुंबईतील तर एक रुग्ण पुण्याचा आहे. यासह राज्यात  ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या 48 एवढी झाली आहे. मुंबईत आढळलेल्या चार रुग्णांपैकी एक मूळचा मुंबईचा असून इतर तीन छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील आहे. यामधील दोघे दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. तर एकाने टांझानिया येथून प्रवास केला आहे. साताऱ्यातील रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आले असून एकाच कुटूंबातील आहे. पुण्यातील रुग्ण देखील परदेशी प्रवास करून आलेला आहे. 
राज्याच्या आरोग्य विभागानुसार आता पर्यंत मुंबईत – 18पिंपरी चिंचडवडमध्ये १० पुणे ग्रामीण मध्य  6 ,पुणे मनपा भागात 3 ,सातारा  3 ,
कल्याण डोंबिवली  2 , उस्मानाबाद 2 ,बुलढाणा  1 ,नागपूर  1 ,लातूर 1 वसई विरार  1 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 
ओमाक्रॉन व्हेरिएंटच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता आणि खबरदारीचा उपाय म्हणून नवीन नियमावलीही जाहीर केली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती