मोहम्मद सलीमवर २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत
मोहम्मद सलीमबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याच्यावर २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो मूळचा मुंबईचा रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून तो हैदराबादमध्ये राहत होता. शब्बीरवरही दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
गँगस्टर छोटा राजनच्या मुंबईत घरात चोरी झाली होती
नागपूर पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, काही वर्षांपूर्वी मोहम्मद सलीमने मुंबईतील गँगस्टर छोटा राजनच्या घरावर हल्ला करून तेथून 4-5 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरले होते.
मुंबईहून हैदराबादला पळून गेला
राजनच्या टोळीतील सदस्यांनी त्या गुन्ह्यात मोहम्मद सलीमच्या साथीदारावर गोळ्या झाडल्या. यानंतर सलीम मुंबईतून पळून गेला आणि हैदराबादमध्ये राहू लागला.
नागपुरातील व्यापाऱ्याच्या घरी चोरी
26 मार्च रोजी सलीम आणि त्याचा साथीदार शब्बीर यांनी नागपुरातील एका व्यावसायिकाचे 18 लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरली होती. त्यानंतर दोघेही तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले.
पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली
पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या मदतीने दोन्ही आरोपींना हैदराबाद येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी चोरीनंतर हे दागिने मुंबईतील कुणाला तरी विकल्याचे सांगितले.