चिचपाणी धरणात बूडून दोन चिमुकल्या बहिण भावाचा करुण अंत...

सोमवार, 13 जून 2022 (07:58 IST)
जिल्ह्यातील आकोट तालूक्यातील डांगरखेडा या आदीवासी गावातून पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या बहिण भावाचा धरणात बूडून करुण मृत्यू झाल्याची जिवाला चटका लावणारी दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने या परिसरात शोककळा पसरली आहे.
 
याबाबत सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार डांगरखेड येथिल आदीवासी केशवराव बेलसरे हे आपल्या शेताची किस्तकाडी पूर्ण करुन रविवारी बाजार आणि बि बियाणे खरेदीकरिता आकोट येथे गेले होते. त्यांचेमागे त्यांचा नऊ वर्षिय मुलगा युवराज आणि आकरा वर्षीय मुलगी प्रतिक्षा ही दोघे शेजारच्या मुलीसोबत धरणावर पोहायला गेले. युवराज पाण्यात ऊतरला. त्याची बहिण प्रताक्षा व तिची मैत्रिण पाण्याबाहेर होत्या. पोहताना युवराज बुडत असल्याचे प्रतिक्षाने पाहिले. आणि भावाला वाचविण्यासाठी तिने पाण्यात ऊडी घेतली. परंतु दोघांनाही बाहेर पडता येत नव्हते. हे सारे पाहून प्रतिक्षाची मैत्रिण धावतच गावात मदतीसाठी गेली. पण लोकाना येण्यास ऊशिर झाला आणि या चिमुकल्या बहिणभावाचा करुण अंत झाला. ही खबर मिळताच पोपटखेड येथिल पांडूरंग तायडे यांचे नेतृत्वात एकलव्य बचाव पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या संदर्भात आकोट ग्रामिण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. ह्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती