कोरोना आजाराने दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना शासकीय व खाजगी कामासाठी मृत्यू दाखल्याची आवश्यकता भासत आहे. यासाठी मनपाच्या वतीने मोफत व घरपोहच मृत्यु दाखला देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सक्रिय झाली होती. या लाटेने अक्षरश कुटूंबे उध्वस्त केली. यामध्ये दरदिवशी बाधितांची विक्रमी आकडेवारी वाढत होती.
दोन ते चार दिवसात पोष्टाने किंवा हस्ते घरपोहच दाखला मिळेल असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात महापौर वाकळे यांच्या हस्ते एका नातेवाईकाला मोफत दाखला देण्यात आला. आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे यावेळी उपस्थित होते.