दरम्यान, पुणे शहरात रविवारी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणासाठी केवळ १५ केंद्रच उपलब्ध होती. या सर्व केंद्रांवर कोवॅक्सिन ही लस देण्यात आली. तसेच १७ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला गेला.
शहरातील एकूण १९४ लसीकरण केंद्रांपैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण करण्यात आले आहे. आजवर एकूण ९ लाख ३५ हजार ५८२ नागरिकांनी लस घेतली असून यातील १ लाख ८० हजार लसी या दहा केंद्रांवर देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या 'टॉप टेन' केंद्रांमध्ये कोथरूड, येरवडा, शिवाजीनगर, धायरी, बिबवेवाडी, पद्मावती या भागातील रुग्णालयातील केंद्रांचा समावेश आहे.