लोकांना लस लवकर मिळावी यासाठी टेंडर करण्यात येत आहे : पेडणेकर

गुरूवार, 13 मे 2021 (16:01 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक वार्डात लस केंद्र सुरू करावे, असे सांगितले होते त्यानुसार केले जात आहे. 18 ते 44 वयोगटासाठी सध्या लस बंद असली तरी जे लसीकरण सुरू आहे ते योग्य पद्धतीने सुरू राहील. दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले गेले पाहिजे. दरम्यान, आपल्याकडे 20 हॉस्पिटल आणि 240 अधिक लसीकरण केंद्र आहेत. जास्त रुग्ण असलेले राज्य लवकर कोरोनापासून मोकळे व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या पहिल्या कंपन्या टेंडर बाबत पुढे येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच लोकांना लस लवकर मिळावी यासाठी टेंडर करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
 
कोविड रुग्णांवर उपाचर सुरु आहेत. कोविड रुग्ण कमी होत असताना आता  म्युकरमायक्कोसिसचा पादुर्भाव होत असल्याचे पुढे आले आहे. हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. म्युकरमायक्कोसिसचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, हे 111 रुग्ण हे बाहेरचे आहेत. कोविड लसबाबात आपण जागतिक स्तरावर निविदा काढली आहे. जागतिक स्तरावर ग्लोबल टेंडर काढलेली आपली पहिली महानगरपालिका आहे. Icmr च्या नियमाद्वारे हे टेंडर घेतले जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली.  ज्या पहिल्या कंपन्या टेंडर बाबत पुढे येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल. लोकांना लस लवकर मिळावी यासाठी टेंडर करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
 
कर आणि खर्च टेंडर घेणाऱ्यांनी करावे कोल्ड स्टोरेज आमच्याकडे आहेत. पण जर वॉर्डसना आणखी स्टोरेज हवं असेल तर त्यांनी स्वतंत्र स्टोरेज बनवावे. वर्क ऑर्डरमध्ये कंपनीने काम व्यवस्थित केले नाही तर त्यांना बाहेर काढू शकतो. सर्वांना नियम सारखे असतील, असा इशारा महापौरांनी यावेळी दिला. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती