मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला आहे. हवामान खात्याने कोकण, घाट आणि विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी तसेच सातारा घाट आणि पुणे घाटासाठी गुरुवारी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटांवर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. आज उर्वरित महाराष्ट्रासाठी 'ग्रीन अलर्ट' जारी करण्यात आला आहे, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ आकाश असेल आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियासाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.