मनपाच्या हौदात पडून बालकाचा मृत्यू, आयुक्त उत्तर ने देता निघून गेले

शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (10:51 IST)
मनपाने बांधलेल्या पुर्वसितांच्या इमारतीजवळ असलेल्या हौदात पडून आठ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूला मनपा जबाबदार असल्याचे सांगत नातलग आणि या भागातील रहिवाशांनी मनपा कार्यालयात ठिय्या दिला. विलाप केला. सोमवारपर्यंत न्याय न दिल्यास मंगळवारपासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विविध ठिकाणची अतिक्रमणे हटवताना विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी गरुड चौकात एसओएस समोर मोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारती बांधताना एक मोठा हौद बांधण्यात आला होता. या हौदात पाणी साचले होते. त्यावर झाकणही नव्हते. खेळता खेळता रितेश सन्मुखराव हा मुलगा हौदात पडला आणि मरण पावला. याची दाद मागायला गेलेल्या या नागरिकांच्या बैठकीतून आयुक्तांनी काढता पाय घेतला. आयुक्त पळून गेले असा आरोप नगरसेविका उषाताई कांबळे यांनी केला आहे. दरम्यान नागरिकांचा क्रोध पाहून मदत देण्याचे आश्वासन मनपाच्या वतीने देण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती