सदर घटना रविवारी 21 एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास खोपोली जवळ घडली.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. बस रायगडच्या खोपोली जवळ आली असता बस मध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला. प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बसमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला. नंतर बस पूर्णपणे जून खाक झाली.
घटनेची माहिती मिळतातच महामार्ग पोलीस, अग्निशमनदल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था डेल्टा फोर्सने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर दोन तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले. या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती.