गद्दार दिनाला प्रतिष्ठा आणि मान्यता दिल्याबद्दल सरकारचे आभार, संजय राऊत यांचा टोला

मंगळवार, 20 जून 2023 (21:08 IST)
ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी ठिकठिकाणी गद्दार दिनाचे आंदोलन केले. हे आंदोलन करणाऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली. याचा अर्थ सरकारने गद्दार दिनाला मान्यता दिली. गद्दार दिनाला प्रतिष्ठा आणि मान्यता दिल्याबद्दल सरकारचे आभार आणि कौतुकच करायला हवं, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हाणला.
 
संजय राऊत म्हणाले, गद्दार दिनानिमित्त ठाकरे गटाचे ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वातही राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले आहे. आंदोलन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. याबाबत मी उद्धव साहेबांशी मगाशी बोललो. आंदोलनावर कारवाई होत आहे म्हणजे सरकारने गद्दार दिनावर शिक्कामोर्तब केले आहे. हा आमच्या विरोधात दिवस आहे. तो साजरा करु नये, हाच सरकारचा हेतू आहे. म्हणूनच सरकारने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
 
मी युनोत मागणी केली आहे की गद्दार दिन साजरा करायला मान्यता द्यावी. जसा फादर्स डे, मदर्स डे साजरा होतो. तसाच २० जून हा गद्दार दिन म्हणून साजरा करावा. कारण आजच्या दिवशी जे झाले आहे ते केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला धोकादायक आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती