दिल्लीसारखे दोन मस्ताने महाराष्ट्रातही आहेत. वाघाचं कातडं पांघरून लांडगे गोरेगावला निघाले- संजय राऊत

सोमवार, 19 जून 2023 (09:11 IST)
आपला देश ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सवर चालतो.मोदी, शहा, फडणवीस झूट आहे.दुर्लक्ष करा. आपण एका युध्दामध्ये उतरलो आहोत.युध्दात छातीवर वार झेलणारे शिवसैनिक आहोत.सगळ्यांनी एकत्र येवून मुळ शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे.आमचं सरकार येऊ द्या. 24 तासांत मोदी, शहा,फडणवीस शिवसेनेत येतील.

ईडीच्या भयाने फडणवीस यांचा शिवसेनेत प्रवेश अशी बातमी आपण सामनात वाचू. महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवू असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.वर्धापन दिनामिनित्त ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबिर आहे. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित झाले आहेत.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात फोडाफोडीचं राजकारणं सुरु आहे. दिल्लीसारखे दोन मस्ताने महाराष्ट्रातही आहेत. वाघाचं कातडं पांघरून लांडगे गोरेगावला निघाले आहेत. महाराष्ट्रासह मुंबईची लूट सुरु आहे. आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही. दिल्लीतील नेत्यांची सध्या मुंबई वारी सुरु आहे. दिल्लीतील नेते मुंबईवर कब्जा सांगत आहेत. 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा गहाळ झाला.गहाळ झालेल्या नोटांनी फोडाफोडी तर सुरु नाही ना? असा सवाल त्यांनी केला. डुप्लिकेट माल खूप असतो मात्र शिवसेना एकच आहे.निवडणुक आयोगाला पैसे देऊन तारीख ठरवली काय? असेही ते म्हणाले.

Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती