मिळालेली माहिती अशी की, मुकेश परदेशी हा हातात कोयता घेऊन भर बाजार पेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी आला होता. लोकांना काही कळण्याच्या आतच त्यानं कोयत्यानं अगोदर आपलं गुप्तांग कापलं नंतर गळा चिरला. हा प्रकार पाहून लोकांमध्ये भीती पसरून पळापळ झाली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला तातडीनं रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं आहे. मुकेश परदेशी हा तरुण पेशानं पेंटर होता. या आत्महत्येचे कारण समजून शकलेले नाही.