ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक, नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या

शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (09:56 IST)
ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल मागवला होता. पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील पूयारदंड भागातल्या रोहित राजेंद्र जांभुळे या युवकाने हे टोकाचे पाऊल उचलले. 
 
काही दिवसांपूर्वी त्याने ऑनलाईन १५ हजार रुपयांच्या मोबाईलची खरेदी केली त्यासाठी त्याने ऑनलाईन १० हजार रुपये भरले आणि उर्वरित ५ हजारांची कशीबशी जुळवाजुळव केली. प्रत्यक्षात जेव्हा पार्सल घरी आले तेव्हा त्यात २ रुपयांची रिकामी पाकिटे, एक बेल्ट आणि खरड्याचा तुकडा अशा वस्तू आढळल्या. त्यामुळे निराश झालेल्या रोहितने घराजवळील विहिरीत झोकून आत्महत्या केली. मोबाईल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 
 
पैशाची जुळवाजुळव करून मुलगा आईसोबत पोस्टामध्ये पार्सल आणायला गेली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल उघडले. मात्र त्या पार्सलमध्ये मोबाईल नव्हता. मोबाईल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला. परंतु त्या कंपनीला फोनच लागत नव्हता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती