राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अमरावतीच्या चांदूर रेल्वेत फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने ही तक्रार दाखल केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला होता. या वचननाम्यात आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. तसेच एकही वचन खोटं ठरणार नाही, असं जाहीरनामा प्रसिद्धीदरम्यान सांगितलं होतं.
निवडणुकीपूर्वी 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर 30 टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या 56 उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे त्यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती. परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केली आहे असं म्हटल आहे.