वीज बिलाच्या वसुलीला हिंसक विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

रविवार, 28 मार्च 2021 (10:13 IST)
वीज बिलाच्या वसुलीला हिंसक विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. महावितरणची थकबाकी हे भाजपचे पाप असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधिक्षक अभियंता शेख यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा निषेध करत डॉ. राऊत यांनी शनिवारी प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात वीज ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे.
प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे. भाजप नेत्यांनी कायदा हाती घेऊन महावितरणचे कर्मचारी, अधिकारी यांना मारहाण करणे वा त्यांच्या विज बिल वसुलीच्या कामात अडथळे निर्माण करणे हे चुकीचे कृत्य असून असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ.राऊत यांनी म्हटले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती