राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली हे तर निश्चितच होतं. मात्र आता पक्षासोबत पवार कुटुंबातही फूट पडल्यांचं स्वत: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘पक्ष आणि कुटुंब फुटलं’ असं व्हॉट्सअॅपवर स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवलं आहे.
महाराष्ट्रात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ‘अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी
राष्ट्रवादीतून बंड करून भाजपला पाठिंबा दिलेल्या अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शरद पवारांना विश्वास न घेता अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याने आता अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या थोड्याच वेळात होणाऱ्या पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली हे तर निश्चितच होतं. मात्र आता पक्षासोबत पवार कुटुंबातही फूट पडल्यांचं स्वत: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘पक्ष आणि कुटुंब फुटलं’ असं स्टेट्स व्हॉट्सअॅपवर सुप्रिया सुळे यांनी ठेवलं आहे.