या नव्या नियमावलीनुसार, राज्यातील मुंबईसह 14 जिल्ह्यात नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे 100 टक्के पूर्ण क्षमतेने सुरु होणार.
मुंबईसह मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, सातारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि कोल्हापूर हे जिल्हे 100 टक्के पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
राज्यातील चित्रपट गृहे, उद्यान, मॉल्स वॉटर पार्क पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र मॉल्स चित्रपटगृहे आणि इतर ठिकाणी लसीचे दोन डोस घेणाऱ्यानाच प्रवेश देणे बंधनकारक.
तर राज्यातील काही उर्वरित जिल्ह्यामध्ये मनोरंजन स्थळे आणि पर्यटन स्थळे 50 टक्केच्या क्षमताने सुरु राहतील. लग्न सोहळा, सांस्कृतिक समारंभात धार्मिक कार्यक्रमात सभागृहात 50 टक्के क्षमता देण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रमा साठी शैक्षिणक खेळ साठी, अंत्य संस्कारासाठी 50 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली.