यवतमाळ येथे पुसद तालुक्यातील वसंत नगर येथील चौथ्या गल्लीत फुटबॉल खेळण्याच्या वादातून झालेल्या गोळीबाराने संपूर्ण परिसर हादरला. गोळीबारामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 8 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. वसंत नगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
सदर घटना 8 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून 9 ऑगस्ट रोजी वसंत नगर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या गोळीबारात अझीजखान हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वसंत नगर पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हसन खानचा चुलत भाऊ आणि शेख साहिल यांच्यात फुटबॉल खेळण्यावरून वाद झाला होता . वादानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर शेख साहिल त्याच्या तीन मित्रांसह हसन खानच्या घरासमोर आला आणि त्याने बंदुकीतून हवेत अनेक गोळ्या झाडल्या.
त्यावेळी अझीझ खान पुढे आला आणि त्याला गोळी लागली. जखमीला प्रथम पुसद येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपास सुरू केला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर तीन आरोपी फरार आहेत.