आक्षेपार्ह वक्तव्य करण्यासाठी नारायण राणे यांच्यावर अटक करण्याची कारवाई करण्यात आली.या दरम्यान हिंगोली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणे यांना मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे या सम्पूर्ण प्रकरणात आता नवीन प्रकरण उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बांगर यांनी राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढली आणि राणे यांच्या विरोधात प्रक्षोभक विधान केले आहे .त्यांनी 'पोलिसांना जरा बाजूला करा राणेंचा कोथळा बाहेर काढेन' असे विधान केल्यानं भाजपचे कार्यकर्ताही संतापले आहे.ते आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे.