Shinde Vs Thackeray : शिंदे -ठाकरे गटाचे कार्यकर्ता भिडले

Webdunia
रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (12:16 IST)
Shinde Vs Thackeray :ठाणे शहरात हजूरी भागात  ठाकरे गटाकडून 'होऊ द्या चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून चौक सभांचे आयोजन करण्यात आले. शनिवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने या कार्यक्रमात राडा झाला. 

केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली आश्वासने खोटी असण्याचा दावा ठाकरे गटाने केला असून या साठी कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आक्षेप घेत शिंदे गटाचे कार्यकर्ता ठाकरे च्या समोर आले आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन आपसांत जुंपली. पोलिसानी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 

ठाकरे गटाकडून ठाण्यातील हजुरी भागात होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा विरोध करत शिंदे गटाचे कार्यकर्त्यानी राजकीय वातावरण बिघडवू नका असं म्हणत आक्षेप घेतला.

कार्यक्रमाला रद्द करण्याची मागणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिला. यावरून बाचाबाची झाली आणि वाद वाढत गेला.तणावाची स्थिती निर्माण झाली. या वर पोलिसांनी मध्यस्थी करत वादाला मिटवले ठाकरे गटाचे कार्यकर्ता तिथून निघून गेल्याने वाद मिटला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.  
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख