वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (08:17 IST)
प्रसिध्दी झोतात असणार्‍या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई  केल्याची माहिती समोर येत आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचुन सुजाता पाटील यांच्यावर कारवाई केल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
मेघवाडी डिव्हीजनच्या सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनने काही वेळापुर्वी कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. तक्रारदाराकडे 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती. तडजोडीअंती 40 हजार रूपये देण्याचं ठरलं आणि त्याच प्रकरणी सुजाता पाटील यांच्यावर काही वेळापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं  कारवाई केली आहे. अ‍ॅन्टी करप्शनच्या  कारवाईनं राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती