Sarpanch Santosh Deshmukh murder case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी म्हटले आहे की, हल्लेखोरांनी सरपंचांवर अत्याचार करून त्यांची हत्या करताना व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात पीडितेवर झालेल्या क्रूरतेचे दस्तऐवजीकरण केले आहे. हे व्हिडिओ आणि छायाचित्रे गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दाखल केलेल्या आरोपपत्राचा भाग आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमास्टम रिपोर्ट समोर आला आहे. पोस्टमास्टम रिपोर्टनुसार देशमुख यांचा छातीवर उजव्या व डाव्या बाजूला आणि बरगडीवर मारहाण केल्याचा जखमा आहे. तसेच त्यांना झालेल्या मारहाणीमुळे जखमांच्या खूणा काळ्या-निळ्या झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. पोस्टमास्टम रिपोर्टनुसार सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीराच्या अनेक भागावर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. बेदम मारहाण यामुळे त्यांचे शरीर काळे निळे पडले होते. तसेच आरोपी नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करीत होते. देशमुख यांना एवढे मारण्यात आले की अगदी पाईपचे तुकडे झाले. त्यांच्या हनुवटीवर जखमांच्या खूणा आढळून आल्या असून कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा झाल्याच्या खुणा आहे. तसेच पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने त्यांना खूप खोलवर जखमा झाल्या असून नाकातून रक्त बाहेर येऊन वाळले. छाती आणि गळ्यातील समोरील उजव्या बाजूला देखील जखमांच्या खूणा आहे. तसेच देशमुखांच्या कोपऱ्यावर, दंडावर, हाताच्या मुठीवर, मनगटावर तसेच मधल्या बोटाला जखमा आहे.तसेच त्यांचा हात काळा निळा पडलेला होता, असेही रिपोर्टमध्ये म्हटलेय. देशमुख यांच्या पायावर आणि पोटावर जखमा झाल्याने काळे निळे पडल्या होत्या. मांडीवर आणि गुडघ्यावर मारहाणीच्या जखमा असून काळ्या निळ्या पडल्या आहे. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मारहाणीमुळे त्यांची पाठ काळी-निळी पडली होती.