पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी नामांकित केले आहे. मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पॅरिसला जाऊन हा प्रस्ताव सादर केला. आता ते स्वतः मे महिन्यात युनेस्कोसमोर दुसरे सादरीकरण देतील. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावात महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांचा समावेश आहे.