सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे.शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या भूमिपूजन करण्यात येत होते. अनिल बाबर भूमिपूजन करत असताना भिडे यांनी त्यांना टोपी दिली. यानंतर बाबर यांना त्यांनी मास्क काढण्याची सूचना केली. आमदार बाबर यांनी संभाजी भिडेंच्या सूचनेप्रमाणं मास्क काढून ठेवला आणि भूमिपूजन केले. या भूमिपूजन कार्यक्रमाला संभाजी भिडे आणि त्यांचे सहकारी विना मास्क जमलेले पाहायला मिळाले.