शिवसेनेना राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार

मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (16:27 IST)
शिवसेनेनाही राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार आहे.  शिवसेनेच्याबैठकीत शिवसंपर्क अभियानाचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेची ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीनंतरच राज्यभरात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गावोगावी शिवसेना पोहोचवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं आढळराव-पाटील यांनी सांगितलं.
 
या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलंय. आता राज्यातील पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती