मनसुख हत्या आणि जगविख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया प्रकरणाबाबत फार महत्त्वाची घडामोड समोर आली असून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित खंडणीबाबत केलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चांदीवाल समिती नेमण्यात आली आहे. या समितीसमोरआता माजी मंत्री अनिल देशमुखांना आज हजर करण्यात आले आहेत. चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर चांदीवाल आयोगाने सचिन वाझेंना परवानगी दिली.