ऑनलाईन गेमचे बळी बनून अनेकदा कर्जबाजारी होण्याचे प्रकरण समोर येतात. तसेच ऑनलाईन गेम मुळे जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहे. आता कल्याण पूर्व संतोषनगर रहिवाशी किरण परब(25) ऑनलाईन गेम मुळे कर्जबाजारी झाला त्याच्यावर एका खाजगी बॅंकेचे तीन लाखाहून अधिकचे कर्ज होते. त्यांनी त्यांच्या आईच्या दागिन्यांवरही दीड लाखांचे कर्ज घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील संतोष नगर भागात ते आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात त्यांचे आई वडील आणि बहीण आहे. किरण यांना ऑनलाईन गेमची सवय लागली होती. या ऑनलाईन गेम मुळे तो कर्जबाजारी झाला.
सोमवारी पहाटे 4 वाजता किरण घराबाहेर पडले आणि सकाळी 6 वाजता कुशीवली गावातील झारणा परिसरात जाऊन स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल स्वतःवर ओतून पेटवून आत्महत्या केली. त्याने स्वतःला पेटवल्यावर परिसरात आगीचे लोट दिसले. नागरिकांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह उल्हासनगर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.