१८ तारखेनंतर भूमिका मांडणार- राजू शेट्टी

गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (19:34 IST)
शेतकऱ्यांनो आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो, असे थेट राज्य सरकाराला थेट आव्हान देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले.
 
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन शेट्टी यांनी केले. स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केले आहे.
 
आज आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन होणार आहे. यंदाच्या हंगामातील स्वाभिमानीचे हे पहिलेच आंदोलन आहे. केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 करावा, इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी आणि ऊस परिषदेत केलेली एफआरपी अधिक 350 रुपये ही मागणी कारखानदारांनी पूर्ण करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होतंय. कारखानदारांना याबाबत काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी आवाहन केलं आहे. त्यामुळे कारखानदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्यावर स्वाभिमानीची पुढील रणनीती ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती