IPL 2023: सर्व संघांनी रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली, कोणत्या संघात काय बदल झाले जाणून घ्या
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (19:05 IST)
आयपीएल 2023 साठी, सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतर 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणाऱ्या मिनी लिलावात सर्व संघ आवश्यकतेनुसार खेळाडू खरेदी करून पूर्ण संघ बनवतील. प्रत्येक फ्रँचायझीला कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यापूर्वी ट्रेडिंग विंडोद्वारे खेळाडूंची देवाणघेवाण करण्याची संधी देखील होती.
कोलकाता संघ सर्वाधिक सक्रिय होता. कोलकाताने गुजरात टायटन्सकडून लोकी फर्ग्युसन आणि रहमानउल्ला गुरबाज यांना विकत घेतले आणि दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दुल ठाकूरचा समावेश केला. यानंतर सर्व संघांनी काही खेळाडूंना सोडले आहे. कोलकाता संघाने सर्वाधिक 16 खेळाडूंना सोडले आहे.
चला कोणत्या संघात काय बदल झाले जाणून घ्या-
मुंबई इंडियन्स-
रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान , कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.