महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर केला. 650 रिक्त पदांची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या परीक्षेत सुनील कचकड यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर निर्मल भोसले आणि गणेश जाधव यांनी तिसरा क्रमांक पटकवला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) कडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे. तीन वर्षांपासून रखडलेला निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्याचे समाजतातच आनंद साजरा केला. PSI पदासाठी निकाल जाहीर केला असून 65 पदांचा निकाल राखीव ठेवला आहे. जाहीर केलेली निवडची यादी तात्पुरती असून उमेदवारांना अर्जामध्ये अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे,प्रमाणपत्रांची पडताळणी मध्ये काहीसा फरक असण्याची शक्यता असून उमेदवारांच्या गुणवत्तेच्या क्रमात बदल होण्याची शक्यता आहे. उमेदवार अपात्र असण्याची शक्यता असू शकते.
दुर्बल घटकांसाठी किंवा आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या उमेदवारांसाठी राखीव पदांचा न्यायालयाचे आदेशांना विचारात घेऊन स्वतंत्रपणे निकाल जाहीर करण्यात येणार.
अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.