बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ऑगस्ट 9 रोजी ठिय्या आंदोलन

शनिवार, 23 जुलै 2022 (08:48 IST)
बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवार दि. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळावीत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित मध्यवर्ती समितीच्या बैठकीत देण्यात आली. या बैठकीत कन्नड प्राधिकरणाकडून केली जाणारी गळचेपी व बेळगाव ग्रामीणच्या आमदारांकडून म. ए. समीतीबद्दल झालेल्या वक्तव्याचा बैठकीत निषेध करण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती