महिला हॉकी आशिया कप चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केला जात आहे. या स्पर्धेतील सुपर-4 सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला चीनकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताकडून फक्त मुमताज खानला गोल करता आला. तिच्याशिवाय उर्वरित खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. चालू स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा हा पहिलाच पराभव आहे.
दुसऱ्या क्वार्टरमध्येही अनेक संधी मिळाल्या पण दोन्ही संघांना गोल करता आला नाही. 27 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो पुन्हा अपयशी ठरला. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला चीनने गोल करून दबाव वाढवला. शेवटच्या क्वार्टरमध्ये चीनने 47 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले.