पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री घडली. आरोपी राजेंद्र रहाटे अविवाहित आहे. त्याने त्याच्या घरात डझनभर कोंबड्या पाळल्या आहे. त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीने सांगितले की, रात्री १०:३० वाजता त्याने रहाटेला त्याच्या खोलीत असलेल्या कोंबडीसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना पाहिले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शेजाऱ्याने त्याच्या मोबाईलवरून रहाटेच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नंतर, तक्रारदाराच्या १० वर्षांच्या मुलानेही एक धक्कादायक गोष्ट सांगितली. अल्पवयीन मुलाने सांगितले की, आरोपी रहाटेने त्याला अनेक वेळा अश्लील व्हिडिओ दाखवले होते आणि त्याच्या पालकांना काहीही न सांगण्याची ताकीद दिली होती.