रस्ते अपघाताचा बळी, नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे निधन

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (10:07 IST)
भाजपच्या महिला नेत्या आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे  यांचा पनवेलमधील रॉयल हॉटेलजवळ अपघात  झाला. यात त्यांचा जागीच मृ्त्यू झाला. त्या हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असताना एका भरधाव स्विफ्ट कारने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या प्रभाग क्रमांक 19 च्या भाजपच्या नगरसेविका होत्या.
 
या अपघातात माजी नगरसेविका आणि भाजपच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना राऊत या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात खराब रस्त्यामुळे झाला आहे. संबंधित रस्ता अर्धवट काँक्रिटीकरण  केलेला होता. दरम्यान रस्त्यावरुन जाणारी एक कार खड्ड्यात अडकली. कार काढण्याच्या प्रयत्नातच गाडी अनियंत्रित होत वेगाने समोर आली. त्यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोंढे आणि राऊत यांना चिरडले. यात मुग्धा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कल्पना राऊत यांची प्रकृती गंभीर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती