श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधा दिवसेंदिवस अधिक अधिक श्री भगवती दर्शन व्यवस्था सुलभ होण्या करिता तथा त्या अंतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात केली असून, वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा त्याच बरोबर मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते.
सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण होणेकामी अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती १०० रुपये प्रमाणे श्री सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा सोमवार, १३ फेब्रुवारी पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदरची सुविधा ही भाविकांसाठी संपूर्णतः ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे. तशी उपलब्ध असेल. ऐच्छिक सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या वय वर्ष १० वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना सदरचा पास मात्र निशुल्क असेल. मात्र सदर सशुल्क व्हीआपपी दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी ९ ते ६ वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध होणार आहे.